Friday, August 6, 2010

भरकटलेल्या 40 सापांची जंगलात पाठवणी


प्रहार प्रतिनिधी

वन अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्लान्ट्स अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी’च्या (पॉज) सदस्यांनी या सापांना पकडून जंगलात सोडले आहे. मुंबईतील विविध भागांत नाग, घोणस, फुरसे, मण्यार, हरण टोळ, धामण, दिवड, नानेटी, कुकरी, काविदा, डुरक्या घोणस, अजगर या जातीतील साप आढळले आहेत.

मुंबई- पावसाचे पाणी शिरल्याने बिळातील वास्तव्य धोक्यात आल्यामुळे मुंबईतील नागरी वसाहतीत विविध जातींचे 40 साप आढळून आले होते. वन अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली प्लान्ट्स अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या (पॉज) सदस्यांनी या सापांना पकडून जंगलात सोडले आहे. मुंबईतील विविध भागांत नाग, घोणस, फुरसे, मण्यार, हरण टोळ, धामण, दिवड, नानेटी, कुकरी, काविदा, डुरक्या घोणस, अजगर या जातीतील साप आढळले आहेत.


जुलै महिन्यामध्ये मुलुंड, भांडुप, कांजुर मार्ग, घाटकोपर, चेंबूर, बीएआरसी आदी भागांतून 40 साप पकडण्यात आले. याबाबत पॉजसंस्थेचे संचालक सुनीश सुब्रमणिअन यांनी सांगितले की, मुंबईत होणारी जंगलतोड आणि बांधकामे यामुळे सापांचे आश्रय स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षित ठिकाणांचा शोध घेताना अनेकदा साप शहरी भागात प्रवेश करून कचरा साचलेल्या ठिकाणी, झाडाझुडपांमध्ये, मातीच्या ढिगा-यांमध्ये वास्तव्य करतात. त्यामुळे पावसाळ्यात रहिवाशांनी आपल्या घराचे दरवाजे बंद ठेवावे तसेच घराच्या खिडक्यांना शक्य असल्यास जाळी बसवावी. परिसरात साप आढळल्यास त्याना ठार न करता,‘ पॉज मुंबई रेस्क्यू हेल्पलाइन9892179542 / 9833480388 क्रमांकावर संपर्क साधावा.

Website link : http://www.prahaar.in/mumbai/28091.html


No comments: